लिव्ह-ईनमध्ये राहणे तरुणाला पडले महागात, तरुणीच्या भावाने घरात घुसून केली मारहाण

पुणे : लिव्ह-ईनमध्ये राहणार्या तरुणाला तरुणीच्या भावाने घरात घुसून बेदम मारहाण केली. त्याला पट्टी तसेच वायरने मारहाण केल्याने मारहाणीत तरुणाच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी व त्याच्या तीन साथीदारावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश बाळासाहेब कांबळे (वय 27, रा. त्रिमुर्तीचौक भारतीविद्यापीठ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्रिमुर्ती चौक भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कांबळे व यातील एका आरोपीची बहीण याच्यासोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनमध्ये राहत होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांसह कांबळे याच्या घरात घुसून मारहाण केली. लाथाबुक्याबरोबरच लाकडी पट्टी, वायरने मारहाण केली. दरम्यान कांबळे हा तेथून पळून जात असताना, देखील आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये कांबळे याच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी कोणी मध्ये आले तर हात पाय मोडू असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक पाटील करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




