जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी २०१४ साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. या राज्यातीलही निवढणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली.
जम्मू-कश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होईल 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर य़ा तीन दिवशी जम्मू कश्मीरमध्ये मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
राजीव कुमार म्हणाले, ” जम्मू कश्मीरमध्ये एकूण 11,838 मतदान केंद्र असतील, तर 87.09लाख मतदार असतील. यात 20 लाखांहून अधिक नवमतदार आहेत. 20 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील मतदार यादी जाहीर होईल. तर हरियांणामध्ये 90 विधानसभेच्या जागा आहेत. याठिकाणी 2.01 कोटी मतदार आहेत. याठिकाणी 20,629 हजार मतदान केंद्र असतील. 27 ऑगस्टला हरियाणातील मतदारांची यादी जाहीर होईल.




