संभाजीराजेंचा सरकारला इशारा; म्हणाले, जरांगेंना काही झालं तर…

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्यांची तब्येत प्रचंड खालावली असून त्यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती अंतरवली सराटी येथे दाखल झाले होते. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत सरकारला एवढी यंत्रणा असून निर्णय घेतला नसल्याचं ते म्हणाले. हे सरकार आंदोलन गुंडाळायलाच बसलंय. मनोज जरांगेंना उद्या काही झालं तर सरकार जबाबदार असेल. मनोज जरांगेंचा जीव महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले.

Advertisement

छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. याशिवाय राज्य सरकार निवांत मुंबईत AC ऑफिसात बसलं आहे. तसेच विरोधी पक्षातील नेते देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. मात्र आता हे चालणार नाही. असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले. तसेच जरांगे पाटलांची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना काही होऊ शकतं. मात्र त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात असं संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र ही बाब राज्यातील इतिहासातील वाईट आहे. जर एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी देखील लावायला बसले आहेत. मात्र त्याची दखल तर नाहीच पण त्यासंदर्भात निर्णय देखील सरकारने घेतलेला नाही. असंही संभाजीराजे म्हणाले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page