कुर्डुवाडी (भोसरे) – रस्ते खोदून ठेकेदार व प्रशासन सुस्त माऊली नगर मधील नागरिक त्रस्त..!


कुर्डुवाडी (भोसरे) – रस्ते खोदून ठेकेदार व प्रशासन सुस्त माऊली नगर मधील नागरिक त्रस्त
माऊली नगर मध्ये अंडर ग्राउंड ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सर्व रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे एक महिना झाला तरी संबंधित ठेकेदार व प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
माऊली नगर हे १९८१ साली प्लाॅटिंग पाडून रस्ते उपरस्ते भरपूर सुविधा असलेले प्लाॅटस गरजू लोकांना व रेल्वे कर्मचाऱ्यांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आले होते त्याठिकाणी घरे उभारली आहेत चालू परिस्थितीत भोसरे ग्रामपंचायतीची घर पट्टी व पाणी पट्टी ४ ते ६ हजार रुपये येत आहे परंतु तीस वर्षांत कुठलीही सुविधा ग्रामपंचायतीने दिली नाही जसे की सर्वाजनीक नळ सार्वजनिक शौचालय आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा कुंड्या अशा सुविधा आतापर्यंत उपलब्ध केल्या नाहीतच परंतु गेले एक महिना संपला तरी अंडर ग्राउंड ड्रेनेज लाईनच्या कामासाठी चांगले रस्ते उपरस्ते खोदून ठेवलेले त्याचे काम पूर्ण होत नाही याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही म्हणून संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून माऊली नगर मधील नागरिकांना त्रास देत आहे अशी चर्चा नागरिक करीत आहे तसेच त्वरित काम पूर्ण न झाल्यास उपोषण करणार असल्याचे ही नागरिकांनी माहिती दिली आहे




