वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; ताम्हिणी घाटातून 13 आरोपींना घेतलं ताब्यात

पुणे : पुण्यातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार आणि चाकूनं वार करून हत्या केली. हा हल्ला कोणी केला? का केला? याचा तपास पोलीस करत असतानाच या हल्ल्यामागं वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेव्हणा असल्याचं समोर आलं. आता याप्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांना अटक केली.

पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती. आता यामध्ये आणखी 13 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

रविवारी रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील नाना पेठ मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना या 13 जणांनी घेऊन त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच कोयत्याने देखील वार केले होते. यामध्ये आंदेकर यांना एकही गोळी लागली नाही मात्र वैद्याने केलेल्या वार मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळावरून या आरोपींनी पळ काढला होता. मात्र दोन दिवसानंतर पोलिसांनी तामिनी घाटामधून तेरा जणांना ताब्यात घेतले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page