‘पीएमपीएल’ चालकाने केला तरूणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बसमध्येही महिला सुरक्षित दिसत नाहीत. आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसमधून रोज प्रवास करणार्या तरूणीचा पीएमपी बस चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात चालक उमेश कांबळे (३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे.
तरूणी सोमेश्वरवाडी बसस्टॉप, पाषाण ते ग्रीन पार्क असा प्रवास करते. ती नेहमी हा प्रवास करते. प्रवासादरम्यान उमेशने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरूणीकडे पाहून हसत मोबाईल नंबर मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या या कृत्यामुळे तरूणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानूसार पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




