चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरुद्ध उद्यापासून धरणे आंदोलन; अकबर शिकलकर यांचा इशारा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरुद्ध उद्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अकबर शिकलकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, पतसंस्थेतील गैरकारभारासह इतर अनेक मुद्द्यावर उदा 23 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

नेमकं काय आहेत मागण्या?

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था चिपळून यांच्या आर्थिक व्यव्हाराची सहकार खात्यामार्फत टेस्ट ऑडिट करुन पतसंस्थेतील अनियमतेबाबत चौकशी करावी.

खोटे ठेवीदार व कर्जदार यांची यादी प्रसिद्ध करावी.

Advertisement

संभाव्य खोट्या नोटा चलनात आणणाऱ्या शाखाप्रमुख अमित कासारकडून पतसंस्थेतील जमा रकमेच्या सर्व नोंदीची चौकशी व्हावी.

पतसंस्थेतील संचालक, त्यांचे नातेवाईक, व 50 शाखेतील संचालक यांच्या सगळ्या कर्जाची तपासणी व्हावी.

ठेवीदार यांच्या केवायसी व ठेवीची रक्कम व कालावधी उघड करावा. जेणेकरुन काळा पैसा गुंतवणूक व संस्थेचे खोटे व्यव्हार उघड होतील.

वरील मागण्यांची दखल घेऊन पतसंस्थेवर प्रशासक नेमणूक होत नाही, तोपर्यंत 23 सप्टेंबर पासून सहाय्यक निबंधक कार्यालय परकार कॉम्लॅक्स चिपळून येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा अकबर शिकलकर यांनी दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page