नागपूरमधील 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक, ‘असा’ लागला शोध

नागपूर – नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी (17 सप्टेंबर) आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. घरामध्ये वडील आहेत का विचारत चिमुकलीवर घरात घुसून नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली होती. पोलिसांना आरोपीचे स्केच बनवत शोध घेण्यात यश आलं आहे. गणपत तानाजी जयपूरकर (56) असं या नराधमाचं नाव असून तो सुतारकाम करत असल्याचं निष्पन्न झालं. आरोपीच्या स्केचच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीचे स्केच प्रसिद्ध केल्यानंतर आरोपीनं ओळख लपविण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिस आयुक्त रवींद सिंघल यांनीही आरोपींची मानसिकता विकृत असल्याचं सांगितलं.

नेमकं काय घडलं होतं?

8 वर्षीय पीडित मुलगी तिच्या 4 वर्षांच्या बहिणीसह घरी होती. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीवरून एक 56 वर्षीय इसम त्यांच्या घरी आला. घरी कोणी नसल्याचं लक्षात येताच त्यानं 9 वर्षीय मुलीला आतील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं पीडितेच्या चार वर्षांच्या बहिणीला शांत राहण्यासाठी 20 रुपये दिल्याचंही तपासात समोर आलंय.

Advertisement

पीडित मुलीचं कुटुंब तीन वर्षांपूर्वी कामा-धंद्याच्या शोधात नागपुरात राहायला आले. घटनेच्या दिवशी ते सकाळी कामावर गेले होते. त्यामुळं घरात 8 आणि 4 वर्षांच्या दोन मुली होत्या. दुपारी आरोपी त्यांच्या घरी आला. त्यानं मुलींना त्यांच्या पालकांबद्दल विचारलं. त्यावेळी मुलींनी घरी कोणी नसल्याचं सांगताच आरोपीनं घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. त्यावेळी सर्वत्र गणेशोत्सवाची धूम होती. आरोपी गणपत जयपूरकर यांच्या घरी गणपतीची पूजा होती. त्यासाठी आरोपी पंडितचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपीची नजर त्या दोन चिमुकलींवर गेली.

घटनेनंतर मुलींचे आई-वडील घरी आले तेव्हा मुलींनी सर्व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पारडी पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. आरोपी अनोळखी असल्यानं पोलिसांनी ‘स्केच’ तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांचे चार पथके आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page