भाजप आमदाराविरोधात ‘लाडक्या बहिणी’ भडकल्या; थेट पोलिसांकडे केली तक्रार

पुणे : पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या फलकावर सहमती शिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे. महिलेने पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन ही तक्रार दिली आहे. शर्मा यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अनेक बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत स्वत:चा फोटो छापला आहे. नात्याचा मान, माय – भगिनीचा सन्मान असे शिर्षक असलेल्या या बॅनरमध्ये दोन महिलांचे फोटो छापले आहेत. आपले फोटो हे विनासंमती छापल्याचा दावा एका महिलेने केला आहे. शिवाजीनगर भागात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर लावले आहेत.

प्रसिद्धीमुळे माझ्या कुटुंबात गैरसमज व त्रास, वाद सुरु झाला आहे. अयोग्य तसेच चुकीचे आणि मनमर्जीने केलेल्या या गोष्टीमुळे मी शिरोळे यांच्याबद्दल ही लेखी तक्रार देत असल्याचे या महिलेने म्हंटले आहे. तिने सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना हा तक्रार अर्ज दिला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना याची चौकशी करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page