विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नेत्यांचे प्रचारासाठी सभा आणि बैठका यांचे सत्र देखील वाढले आहे. केवळ पंधरा दिवसांवर निवडणूका आल्या असून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आयसीयुमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणावर गंभीर भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मतदारांना एक मोलाचा संदेशही दिला आहे. “मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा”, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




