लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत घडलेला खून उघडकीस आणुन आरोपी ताब्यात घेतलेबाबत..!

आज दि. 01/04/2025 रोजी सकाळी 07/30 वा. चे सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर यांचे मार्फत कॉल प्राप्त झाला की, रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर, पुणे याठिकाणी एक इसम जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला आहे. वगैरे मजकुरचा कॉल प्राप्त होताच आम्ही स्वत: लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झालो.
सदर घटनास्थळी इसम नामे रविंद्र काशीनाथ काळभोर वय 45 वर्षे रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर हा त्याचे राहतेघराचे बाहेर पलंगावर रक्ताचे थारोळयात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असल्याचे दिसुन आले. तदनंतर आम्ही लागलीच आय कार, डॉग स्कॉड व ॲम्बुलन्स ला पाचारण केले व ॲम्बुलन्सव्दारे जखमी इसमास प्राथमिक आरोग्यकेंद्र लोणी काळभोर पुणे येथे नेले. परंतु सदर इसम उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्यावरुन सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात कारणावरुन खुन केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.
तदनंतर आम्ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणचे आजबाजुचे परिसरातील लोकांकडे परिस्थीतीजन्य पुराव्यांचे आधारे चौकशी करुन माहिती घेतली. त्यावर मयत इसमाची पत्नी शोभा रविंद्र काळभोर वय 42 वर्षे यांचे इसम नामे गोरख त्र्यंबक काळभोर वय 41 वर्षे यांचेशी अनैतीक संबध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन आम्ही त्या दोघांनाही ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, चौकशीदरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर व मयताची पत्नी शोभा रविंद्र काळभोर या दोघांनी आपसांत संगणमत करुन त्यांचे अनैतीक संबंधात मयत इसम बाधा निर्माण करत असल्याने, मयत इसम हा दि. 31/03/2025 रोजी रात्री 11/00 वा. चे नंतर त्याचे राहते घराचे बाहेर झोपला असताना त्याचे डोक्यात खोऱ्याचे लाकडी दांडक्याने वार करुन, गंभिर जखमी करुन, त्यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर घटनेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस आज रोजी गु.र.नं. 151/2025 बी. एन. एस. क. 103, 3(5) महा. पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन दाखल गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेणेत आले आहे.
सदर गुन्हयाचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ठ स्वरुपाचा असताना देखील अवघ्या 3 तासांचे आतमध्ये आरोपी निष्पन्न करुन, गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करीत आहोत.
आदरपुर्वक
राजेंद्र पन्हाळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लोणी काळभोर पो.स्टे.पुणे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page