तब्बल 28 तासांना संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक; शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ

पुणे : काल अनंत चतुर्दशी दिवशी सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक अखेर संपली आहे. पुण्यातील गणती विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती अखेर अल्का चौकातून मार्गस्थ झाला आहे. पुण्यातील शेवटचा गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहे. काल सकाळी सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक अखेर आज संपली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही तब्बल २८ तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. १८० पेक्षा जास्त गणेश मंडळे अल्का चौकातून मार्गस्थ झाली आहेत.
पोलिसांनी विना अडचण मिरवणूक पार पडली. मोठ्या प्रमाणावर नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितलंय. लेझरच्या वापरावर बंदी होती तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलंय. तसेच आवाजाच्या तीव्रतेचं उल्लंघन केलं असल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणालेत. मोबाईल चोरीच्याही घटना घडल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




