श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा अटकेत, अल्पवयीन साथीदारालाही घेतले ताब्यात

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे नागरिकदेखील हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीन दानपेटी फोडण्याचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्याने पंधरा दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे उघडकीस आले. साहिल अशोक माने (वय १९, रा. इंदीरा गांधी वसाहत, औंध रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

Advertisement

नारायण पेठेतील प्रगतीशील मित्र मंडळ गणपती मंदीरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ११ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट एकचे पथक तपास करत होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेत तपासणी केली असता दानपेटी फोडून पसार होत असलेले चोरटे त्यामध्ये कैद झाले होते. त्यात दुचाकीचा क्रमांकही मिळाला होता. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात माहिती मिळाली असता ओैंध परिसरात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने साहिल याच्या मदतीने फर्ग्युसन रस्त्यावरील संत तुकाराम पादुका मंदिर, शनिवार पेठ सार्वजनिक नवरात्रोत्सव ट्रस्ट, तसेच प्रगतीशील मंडळाच्या मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे सांगितले. त्यानूसार, त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page