भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई, घरफोडी करणाऱ्या चोरट्याला केली अटक

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, चोरट्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज पुण्यातील वेगवेगळ्या भागातील चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत, अशातच आता कात्रज भागातील घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन घरामध्ये शिरुन चोरट्याने ऐवज लंपास केला होता, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिनांक ०३/०७/२०२४ रोजी फिर्यादी सुचिता सचिन दिक्षीत( वय ३५ वर्षे, धंदा गृहीणी, रा. वरखडेनगर, श्रीगणेश अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर ६, दुसरा मजला, कात्रज, पुणे) यांच्या घराचा दरवाजा कुलुप लावुन बंद असताना अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटातील १० ग्रॅम वजनाचा सोन्याचे नेकलेस चोरी केले आहे. तसेच त्याचदरम्यान फिर्यादी मनिषा खुशाल जाधव यांच्यादेखील घराच्या दरवाजाचे कोयंडा उचकाटुन त्यांच्या घरामध्ये प्रवेश करुन त्यांच्या घरातील रोख रक्कम, चांदीचे दागिने चोरी केली आहे. फिर्यादी यांनी दिल्या तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.

Advertisement

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधूत जमदाडे यांना आदेश दिले. त्यानुसार अंमलदार हे अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपी यश संतोष कुचेकर (वय १८ वर्षे, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पदमावती, पुणे) याने केला असुन तो चोरी करून त्याच्या मुळ गाव बोरी, वालचंदनगर, इंदापुर येथे गेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बोरी, वालचंदनगर, इंदापुर येथे जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून 72 हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुकत प्रविणकुमार पाटील, स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, नंदीनी वग्याणी, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, हनमंत मासाळ, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पचार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, निलेश खखैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- संतोष लांडे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page