सासरच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतिवरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरात एका विवाहितेने सासरच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदिनी ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रमेश प्रकाश ठोंबरे आणि मैना प्रकाश ठोंबरे (रा. ३०२, विठ्ठल रुक्मिणी हाईट्स, धायरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदिनीची आई सोनाबाई संजय गायकवाड (४४) सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना १ डिसेंबर २०२० ते १२ सप्टेंबरपर्यंत घडला आहे. नंदिनीचा रमेश याच्याशी विवाह झाल्यापासून मुल होत नाही या कारणावरून वेळोवेळी टोमणे मारून तिचा मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ, मारहाण करून गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




