लायन्स क्लब कात्रज व श्रीराम योगातर्फे शिक्षक दिन साजरा

पुणे – श्रीराम योगसाधना व लायन्स क्लब कात्रज यांच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. धनकवडीतील शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर, राजेश अग्रवाल (डिस्टिक फर्स्ट प्रांतपाल), छगन कापसे (सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस), राम योगाचे अध्यक्ष भानुदास पायगुडे आणि आरती ठोंबरे, नितीन थोपटे, उमेश अग्रवाल. यशवंत इन्स्टिट्यूटचे शितल पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्मिता खोपडे (शिवाजी मराठा स्कूल शुक्रवार पेठ), हर्षवर्धन पाटील (यशवंत इस्टेट बालाजी नग), मंजुषा कुलकर्णी (मॉडर्न कॉलेज गणेश खिंड), सुनिता जकका (विद्या विकास विद्यालय सहकारनगर). प्रोफेसर राजश्री जयभाये (आदर्श हायस्कूल), सुदाम कुंभार (सावित्रीबाई फुले भवानी पेठ), सुजाता गोळे (सरहद हायस्कूल मुख्याध्यापिका) सौरभ भाटिया व संपदा शो त्री (आर्यन स्कूल बिबेवाडी व भिलारेवाडी) संजय भैलुमे (हिरे हायस्कूल पर्वती), दर्शन रिबेका (मगर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल पर्वती दर्शन) तानाजी शिंदे (क्रीडा शिक्षक पुणे) इत्यादी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रलेखा तांबे व प्रकाश तांबे यांनी केले. यावेळी अशोक नेलेकर, हनुमंतराव खंदारे, फेटेवाले सतीश शहा, डॉक्टर रवींद्र दोशी इत्यादींसह अनेकजण उपस्थित होते. आभार प्रदर्शन रवींद्र सादुल व अनिल रेळेकर यांनी केले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




