किल्ले रायगडच्या घाटात भीषण अपघात; बस 50 फूट खोल दरीत कोसळली

रायगड : किल्ले रायगडच्या घाटात बस दरीत कोसळली. रायगडहून ऐरोलीला परत जाताना, पाचाड आणि कोंझर दरम्यान घाटात हा अपघात घडला. घाटातील अवघड वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवानं या अपघातात बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Advertisement

या घटनेनंतर आजूबाजूच्या गावच्या गावकऱ्यांनी आणि घाटातून जाणाऱ्या इतर वाहानातील प्रवाशांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. यानंतर पोलीस आणि महाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page