अल्पवयीन सख्ख्या दोन बहिणींवर अत्याचार; जळगावमधील संतापजनक प्रकार

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 11 आणि 13 वर्षीय दोन सख्ख्या बहिणीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला असे वर्षीय नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




