अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; 2 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगाबाहेर आहेत. न्यायालयाने केजरीवाल यांना नुकताच जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपण दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले. जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, ‘मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही’.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले, “काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल”.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




