मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका करु नये, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांचा शिंदेंना इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तो सगळा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज होणार आहे. शिंदेंना मराठा समाज मानतो. पण आता एकनाथ शिंदे पूर्णपणे मराठा समाजाच्या मनातून उतरणार आहेत. दोन- तीन लोक मुख्यमंत्रीसाहेबांचे कान फुकत आहेत. त्यानंतर मराठा समाजाचा गेम, दगाफटका मुख्यमंत्री शिंदेंनी करू नये. शंभुराज देसाईंना सांगतो की मुख्यमंत्र्यांना समजून सांगा… याचं त्याचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा गेम केला तर ते मराठा समाजाच्या मनातून उतरतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

Advertisement

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, हैदराबाद गॅझेट विषयीच्या काल-परवाच्या हालचाली नाहीत, आमची एक वर्षापासूनची ही मागणी आहे. ती आता लागू करण्याच्या हालचाली चालू आहेत. हे गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे यश आहे. माझं यश नाही. या आजच्या हालचाली नाहीत, तीन महिन्यापासूनची हालचाल आहे. शंभूराजे देसाई साहेबांनी तीन महिन्यापासून याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. आम्हाला सगेसोयरेची अंमलबजावणी पाहिजे आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page