पुण्यात शिवसेना आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारून केला निषेध

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत मांडलेल्या भुमिकेबाबत पुणे शहर शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करून राहुल गांधी यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने केली. यावेळी महिला शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील खासगी दौऱ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील आरक्षण कमी करत संपवण्याची वेळ आल्याची विधान केले होते. त्यामुळे अनसुचित जाती जमाती, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मुलभुत हक्क या घटकात कलम १७ आणि १८ अन्वये समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे, असे असताना आरक्षण रद्द करण्याचे विधान संतापजनक आहे. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनीच जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगत सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले होते.
शिवसेना शहर भानगिरे पुढे म्हणाले की राहुल गांधी यांनी वेळोवेळी संविधान विरोधी विधाने केली असून, लोकसभा प्रचारादरम्यान माध्यमांमध्ये त्यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत या पत्रकार परीषदेत किती वार्ताहर मागास प्रवर्गातील आहेत?किती छायाचित्रकार मागास प्रवर्गातील आहेत असे प्रश्न विचारून आपण संविधान विरोधी आहोत हे दाखवून दिले आहे. विरोधी पक्षनेता हे अत्यंत जवाबदारीचे काम आहे, वेळोवेळी राहुल गांधी यांनी विनाकारण सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले आहे. पुणे शहर शिवसेना राहुल गांधी यांच्या या आरक्षण विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




