पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक; सांगवी पोलिसांची कारवाई

सांगवी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जुनी सांगवी येथे करण्यात आली. प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे (वय २५, रा. रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Advertisement
जुनी सांगवी येथील विसर्जन घाटाजवळ एक जण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रेम चोपडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




