एकनाथ खडसेंना भाजपमध्ये प्रवेश मिळणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीच्या आधीपासून सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली होती. यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले होते. मात्र अजूनही एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला नाही. भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश रोखण्यात आला आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलीशी शप्पथ घेऊन शब्द दिला होता, असे सांगितले. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिले आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयावर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले की, “ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करुन गणेशोत्सवानंतर योग्य निर्णय घेतला जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोर्ट ब्लेयरच नाव बदलण्यात आलं. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही आनंदाची बाब आहे. मोदी सरकार गुलामीची चिन्ह मिटवण्याच हे जे काम करतय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




