सोन्याचे दुकान फोडण्याचा डाव फसला, सायरनमुळे 4 चोरटे फरार

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील एका सोनाराचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक सायरन वाजल्याने चोरीचा डाव फसल्याने चोरटे फरार झाले आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोविंद भाऊसाहेब काळे (वय ५६ वर्षे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथे गोविंद काळे यांचे गोकर्ण ज्वेलर्स नावाने सोने विक्रीचे दुकान असून, काळे दुकान बंद करुन घरी गेलेले असताना ५ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक काळे यांच्या मोबाईलवर गोकर्ण ज्वेलर्स दुकानाच्या सुरक्षा सिस्टीम बाबतचा मेसेज आल्याने काळे यांनी मोबाईल वर दुकानातील सिसिटीव्ही पाहिले असता गोकर्ण ज्वेलर्स दुकानाचे शटर उघडल्याचे दिसल्याने गोविंद काळे तातडीने दुकानाकडे गेले त्यावेळी दुकानाबाहेर स्क्रू ड्रायवर, टामी अशा वस्तू पडलेल्या दिसल्या यावेळी काळे यांनी दुकानातील सिसिटीव्ही तपासले असता चार अज्ञात युवकांनी गोकर्ण ज्वेलर्स या दुकानाचे शटर उघडून चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




