लग्नाचे वचन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गर्भपातही केला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. लग्नाचे वचन देऊन एका विवाहित तरुणाने ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला. पुन्हा शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने तरुणीवर दबाव टाकला. तसेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रचित संतोष गोयल (वय ३४, रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, रचित गोयल याचा विवाह झालेला आहे. मात्र, त्याने ही माहिती लपवली आणि विवाह संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. त्यावरून पिडीत तरुणीची व त्याची ओळख झाली. ओळखीनंतर त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विवाह करण्याचे आमिष दाखविले. पुढे तरुणीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. शारिरीक संबंधातून तरुणी गर्भवती राहिली. मात्र, रचितने तरुणीला रुग्णालयात नेहून तिचा गर्भपातकरून तिची फसवणूक केली. दरम्यान, त्याने दोघांचे शारिरीक संबंधाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले होते. गर्भपात केल्याने तरुणीने त्याच्याशी शारिरीक संबंध करण्यास नकार दिला असता त्याने काढलेले व्हिडीओ तिला दाखवून तुला काय करायचे ते कर असे म्हणत हे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page