उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर महायुतीची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच महाविकास आघाडी व महायुतीमधील नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यावरुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आव्हानाला किंवा चार शब्दात उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”योग्य वेळी उत्तर देऊ”उद्धव ठाकरे यांच्या आव्हानावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देवेंद्र फडणवीसांबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपाचा संदर्भ देत ठाकरेंनी फडणवीसांचा थेट एकेरी संदर्भ देत विधान केलं. “अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलोय. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या (शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या) हिंमतीवर आव्हान त्यांना देत आहे,” असं उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page