अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल, मलायका अरोराच्या वडिलांनी बुधवारी मुंबईत आत्महत्या करत आयुष्य संपवलं. प्राथमिक माहितीनुसार मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या इमारतीतून उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वांद्र्यातील अल्मेडा पार्क असं या इमारतीचं नाव सांगण्यात येत आहे. दरम्यान, मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट असून, आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Advertisement

अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मलायका अरोरा पुण्यात होती, वडिलांच्या निधनाची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page