गृहिणींचे बजेट बिघडणार, कोथिंबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

पुणे – सणवारांच्या दिवसावर महागाईचं सावट पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोथिंबीरीच्या दराचे आकडे समोर आले आणि अनेकांनाच धक्का बसला. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. असं असताना पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 ते 30 रुपयांना मिळणारी जुडी कोथिंबीर दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे.

Advertisement

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथिंबिरीला प्रतिजुडी 450 रुपये भाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळाला आहे. कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page