गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; ‘या’ भागात अवजड वाहनांना बंदी

पुणे – पुण्यातील गणेशोत्सव अवघ्या राज्यातच नव्हे तर देशात व परदेशात प्रसिद्ध आहे. येत्या शनिवारी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. पुण्यातील गणेश मंडळाच्या सजावटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दरम्यान, या काळात शहरात मध्यभागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते १८ दरम्यान, शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या काळात शहरात मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Advertisement

पुण्यात व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहने ये जा करत असतात. या व्यापऱ्यांना त्यांचा माल आता शहराबाहेर उतरावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर छोट्या वाहनातून त्यांनी साहित्य मध्यभागात आणावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत व वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page