धक्कादायक! ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. गजबजलेल्या गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला गणेश पेठेत एकट्याच राहतात. त्यांची मुलगी विवाहित असून, ती धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. आरोपी विश्वकर्मा सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घराजवळ आला. पावसामुळे महिलेच्या घराचा दरवाजा खराब झाला होता. त्यामुळे महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता. त्यावेळी महिलेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून विश्वकर्मा घरात शिरला. तक्रारदार महिला त्यावेळी झोपेत होत्या. विश्वकर्माने महिलेच्या तोंडावर उशी ठेवून तोंड दाबले. महिलेने विरोध करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विश्वकर्मा तेथून पसार झाला.

Advertisement

शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले. गणेश पेठ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. विश्वकर्मा फिरस्ता आहे. तो सध्या सदाशिव पेठेत राहायला आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page