आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे २६ ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता. जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक झाली आहे. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. तो जेव्हा तावडीत सापडला तेव्हा तो गयावया करु लागला. रडू लागला अशी माहिती आता समोर येते आहे.

काय आहे प्रकरण?

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं असून शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा तयार करणाऱ्या २५ वर्षीय जयदीप आपटेला नोटीस जारी करण्यात आली होती. पोलीस त्याचा शोध देखील घेत होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला आधीच अटक केली होती. त्यानंतर आता शिल्पकार जयदीप आपटेला देखील अटक करण्यात आली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page