अवैध दारु वाहतूक करणाऱ्यांवर हडपसर पोलिसांची कारवाई; तब्बल ७०० लिटर गावठी दारुसह टेम्पो जप्त

पुणे : येत्या काही दिवसात पुणे शहरात गणेशोत्सव साजरा होत असून त्या अनुषंगाने अवैध धंदे/वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत पुणे पोलिस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने संतोष पांढरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी तपास पथक अधिकारी व आमदार यांना अवैध धंदे व वाहतूक यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे हडपसर तपास पथकातील अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड हे पहाटेच्या सुमारास पोलिस ठाणे हद्दीत रात्रगस्त करत असताना पोलिस अधिकारी श्रीकांत पांडुळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, वाहन क्रमांक MH12 SX 7439 या वाहनातून अवैध दारुची वाहतूक होत आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्रगस्त अधिकारी उमेश रोकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, भगवान रेजितवाड, यांनी १५ नंबर चौक येथे सापळा रचून गाडी अडवून त्यातील इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे व पत्ता विचारला असता, त्यांनी त्यांची नावे राहुल दामोदर बनसोडे ( वय ४२ वर्ष, रा. काळुराम मंदिराजवळ, सिद्राम मळा, लोणी काळभोर), सोमनाथ पोपट कांबळे ( वय २२ वर्ष) असल्याचे सांगितले. त्यांच्या मारुती क्यारीअर गाडीची पाहणी केली असता, त्यामध्ये ७०० लिटर गावठी दारु आढळून आली. टेम्पो व गावठी दारु असा २,४७,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, आर राजा, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, निलेश जगदाळे, यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, दिपक कांबळे, समीर पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड, यांच्या पथकाने केली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page