गणेश हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले, माझेही कार्यकर्ते…

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता असली तरी यातील घटक पक्षांमध्ये काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता भाजपाच्या नेत्यानेही अजित पवार गटाबाबत धक्कादायक विधान केले आहे. यावरुन आता अजित पवारांनी इशारा दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
माझं बोलणं पंतप्रधान मोदी, केंद्रीय अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाले आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात तर माझे कार्यकर्तेदेखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं माझं काम सुरु आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही, असे ते म्हणाले.
गणेश हाके काय म्हणाले?
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय. यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती आम्हाला पटली नाही, असे ते म्हणाले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




