छत्रपती शिवरायांचा पुतळा का कोसळला? उदयनराजेंनी सांगितली प्रमुख कारणे

सातारा : राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना क्लेशदायी आहे. याचे देशातील सर्व जाती बांधवांना दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे व निसर्गाची अवकृपा या कारणामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये, कोणालाही विशेष लक्ष बनवणे टाळले पाहिजे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवरायांच्या अलौकिक कार्याचा महाराष्ट्रसह तमाम देशवासियांना अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार यांच्याकडे सुद्धा उपयुक्त आहे. त्यांचे अतुलनीय आणि अलौकिक कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर दीपस्तंभ प्रमाणे आहे. राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना दुःख कारक आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी या प्रकरणात संयम बाळगला पाहिजे.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभा राहिला पाहिजे, यासाठी राज्य शासनाने समुद्राच्या वातावरणातील बदलांचा अभ्यास करून अत्यंत मजबूत असा पुतळा उभा करावा, असे खासदार भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




