मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी बोलवली महाविकास आघाडीची बैठक; ‘हे’ मोठे नेते उपस्थित

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बुधवारी (28ऑगस्ट) रोजी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

यावर चर्चा होण्याची शक्यता

राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यासोबतच बदलापूरमधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते चर्चा करणार आहेत. मालवणात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे नेते मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीकडून काय भूमिका व्यक्त केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थेट पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळाच पडल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच या बैठकीला अत्यंत महत्त्व आलं आहे.

मुंबईतील जागावाटप काही जागांवरून अडले

तसेच आगामी विधासभा निवडणुकांसाठी मुंबईतील जागावाटप काही जागांवरून अडले आहे. यावर मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होवून मार्ग काढला जाईल. जागा वाटपास विलंब होऊ नये अन्यथा प्रचाराला वेळ कमी मिळेल अशीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटप चर्चेला विलंब होतोय, ते लवकर होण्यासाठी रोडमॅप तयार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page