राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावली की उलट्या होतात, मंत्री तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई – आगामी निवडणुकीच्या आनुषंगाने सर्व राजकीय पक्ष एकजूट असल्याचं दाखवत असले तर महायुतीत असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसून येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

तानाजी सावंत काय म्हणाले?

आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.

Advertisement

तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.

अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे – उमेश पाटील

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानाला प्रतिउत्तर दिले आहे. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. तुमचा आम्ही आदर करतो, पण अजित दादांना सत्तेत तुम्ही घेतला नाही, याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्र्यानी असे विधान करू नये. आरोग्य मंत्र्याचे असे विधान ऐकण्याऐवजी अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला उमेश पाटील यांनी अजित दादांना दिला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page