घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केली अटक, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवत – घरपोडी करून १७ तोळे सोने लंपास करणारा सराईत घरफोड्यास २० दिवसांत दौंड पोलिसांनी अटक केली. चैतन्य संजय शिंदे (वय २२, रा दोरगेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सात लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती दौंड पोलिस निरीक्षक संतोष कुमार डोके यांनी दिली.

Advertisement

चैतन्य शिंदे याने दौंड पोलिस ठाणे हद्दीत वैशाली वाघमारे(रा. भवानीनगर दौंड) यांच्या घरी चोरी केली होती. यामध्ये सोन्याचे गंठण, राणीहार, चैन, कानातील फुले, मोहन‌माळ, नेकलेस आणि अंगठ्या असा सात लाख वीस हजार रुपये रकमेचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत दौंड पैलिस ठाण्यात २० दिवसांपुर्वी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दौंडचे उपविभागिय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सहकार्याने पोलिस‌ निरिक्षक संतोषकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरिक्षक सागर चव्हाण, एस. डी. राऊत, पांडुरंग थोरात, निखील जाधव, अमिर शेख, संजय पांढरे, पवन माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

संपादक- आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक- अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page