छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आणि काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला, महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Advertisement

विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांनी मालवणला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, मालवण मधील शिवछत्रपतीचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. हे अपयश शौर्याचा मोठा इतिहास असलेल्या नौदलाच्या माथी मारण्याचे पाप राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारने या घटनेबाबत जनतेची माफी मागावी. केवळ उद्घाटनाची घाई असल्यामुळे त्याचा मोठा इव्हेंट करायचा होता म्हणून अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा उभारणी वेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते?

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्या घटनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन करुन भाजपा युती सरकारचा निषेध केला. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page