दिवे घाटात टँकरची पीएमपी बसला धडक, आठ जण जखमी

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने पीएमपी बसला धडक दिली. अपघातात पीएमपी बसमधील वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवे घाटातून दोन दिवसांपूर्वी पीएमपी बस सासवडकडे निघाली होती. त्यावेळी सासवडकडून पुण्याकडे भरधाव वेगाने दूध वाहतूक करणारा टँकर निघाला होता. समोरुन येणाऱ्या पीएमपी बसला टँकरने धडक दिली. टँकर घासत गेल्याने बसमधील वाहकासह प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर टँकरमधील दूध सांडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातून जाणारे वाहनचालक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




