पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल गेला पाण्याखाली

पुणे : गेल्या काही तासांपासून धुवांधार कोसळत असलेल्या पुण्यातील पावसाचा जोर आगामी तासांमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही तासांमध्ये खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे.

Advertisement

खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे तर नदीपात्रातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आला आहे.

पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाची शक्यता

येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page