माजी आमदाराला पोलिसांनी केली अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. भानुदास मुरकुटे असे आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुरकुटे शासकीय रुग्णालयात दाखल
दरम्यान माजी आमदार मुरकुटे यांना अटक केल्यानंतर रात्री त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते. मुरकुटे यांना नेमका कोणता त्रास झाला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात. श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




