पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; हातोडा गुंडाच्या डोक्यात घातला अन्…

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यानंतर वाद झाला. आणि त्या वादातूनच मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ (वय 33 , रा. धायरी फाटा) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तर याप्रकरणी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी याला सिंहगड रोड पोलीस आणि ताब्यात घेतले आहे.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रिज जवळ क्लासिक बार म्हणून हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री गोट्या शेजवळ दारू पिण्यासाठी बसला होता. तर आरोपी आकाश कुलकर्णी हा देखील त्या ठिकाणीच होता. हॉटेलमध्येच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर आरोपी आकाश कुलकर्णी हा हॉटेलमधून बाहेर पडला. आरोपी गोट्या शेजवळ याने आकाश कुलकर्णी याचा पाठलाग सुरू केला. त्याला त्रास देऊ लागला. त्यानंतर दोघेही सिंहगड रस्ता परिसरातीलच सुवर्ण हॉटेल जवळ पोहोचले. या ठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाला.

पुन्हा गोट्या शेजवळ आकाश कुलकर्णी याला त्रास देऊ लागला. त्यानंतर संतापलेल्या आकाश कुलकर्णी याने रस्त्यावरच असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानातील हातोडा घेतला आणि गोट्या शेजवळच्या डोक्यात घातला. गोट्या शेजवळ रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी आकाश कुलकर्णी याला ताब्यात घेतले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page