पुण्यातील पौडजवळ कोसळले हेलिकॉप्टर; हवामान बदलामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर अपघात झाल्याचे समोर आले आहे. पौडजवळील एका भागामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होऊन कोसळले आहे. हवामान बदलातील फरकामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Advertisement

दरम्यान AW १३९ असं या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचं नाव आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई इथून हैदराबादमार्गे विजयवाडाकडे जात होतं. ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातून जात असताना अचानक खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचे कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी झाले आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page