पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला; पोलिसांकडून तपास सुरु

पुणे – राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सर्वत्र नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये काळा पैसा व आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड सापडत आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे.
पुणे शहरात नाक बंदी केली जात आहे. यावेळी सातारा रोडवर सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये 138 कोटी रुपयांचे सोने सापडले. आता हे सोने कोणाचे आहे? ते सोने कोठून आले? हे सोने कुठे जात होते? त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, आम्ही सध्या कागदपत्रे तपासत आहोत. सध्या आयकर विभाग आणि निवडणूक आयोग चौकशी करत आहे. चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.
पोलिसांनी जप्त केलेले सोने हे खाजगी कंपनीच असल्याची माहिती मळत आहे. या सोन्याबाबत कागदपत्रे देण्यास ती कंपनी तयार आहे. हे सोने घेऊन टेम्पो मुंबईवरून पुण्यात आला होता. यावेळी निवडणुकीमुळे पुण्यात नाकाबंदी सुरु असताना त्यात सोने सापडले. आता आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला कागदपत्र कंपनीने मेले केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




