धावत्या रेल्वेत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग; मुंबई- चेन्नई एक्स्प्रेसमधील संतापजनक घटना

मुंबई : चेन्नईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी गुलबर्गा येथे शिक्षण घेत असून, मुंबईत कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली होती. ती चेन्नई एक्सप्रेसने गुलबर्गा येथे जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आजीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा असलेल्या आरोपीने पीडिताला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. परंतु, त्यावेळी पीडिताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा आरोपीने तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला असता पीडिताने याबाबत आपल्या आजीला सांगितले. पीडिताच्या आजीने त्याला जाब विचारत तिकीट तपासनीसला याबाबत माहिती दिली. त्याने त्वरीत पोलिसांना सूचित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धावत्या ट्रेनमध्ये पीडिताचा जाब नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपीला कर्जत स्थानकात उतरून सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




