वाघोलीतील गांजा विक्री करणारी महिला ०१ वर्षासाठी पुणे जिल्ह्यातुन तडीपार..!

वाघोली पोलीस स्टेशन रेकॉर्डवरीलएन.डी.पी.एस. (गांजा) गुन्हयातील आरोपी महिला नामे छकुली राहुल सुकळे वय २४ वर्षे, रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती वाघोली, ता. हवेली, जि. पुणे हिला मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले आहे.

वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील व लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत बेकायदेशीर रित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे, पोलीसांच्या रखवालीतुन पळुन जाणे, उघडयावर चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तीने वाघोली व आसपासचे परीसरामध्ये दहशत निर्माण केल्याने तिचे दहशतीमुळे सदर परिसरातील रहिवासी दडपणाखाली वावरत होते. लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व शारीरिक स्वास्थास धोका निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

Advertisement

सदर महिलेवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने तिचेवर मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्रीमती प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री पंडीत रजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे यांनी सदर रेकॉर्डवरील महिला हिचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर महिलेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम५६ (१) (अ) प्रमाणे तडीपार करणेबाबत मा. पोलीस उप आयुक्त श्री. हिंमत जाधव यांना प्रस्ताव पाठविला असता, यांनी सदर रेकॉर्डवरील महिलेस संपुर्ण पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोणी अवैध धंदे केल्यास किंवा संघटीत स्वरुपात गुन्हे करुन दहशत निर्माण केल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईंची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-४ पुणे शहर, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे, तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, परि. म.पो.उप. सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, समीर बोरडे, मंगेश जाधव यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page