मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नीने पुण्यात शरद पवारांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह हेही उपस्थित होते.
महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. शरद पवार आणि सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांमध्यो कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अरविंद केजरिवाल तुरुंगात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल हे सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप असून, या प्रकरणी त्यांना अटक केली आहे. त्यांनी जामीनासाठी न्यायायल्यात अर्ज केला आहे. मात्र, अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान मनीष सीसोदिया यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. अरविंद केजरिवाल यांना कधी दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




