मोक्का मध्ये पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट- 4 चे ताब्यात..!

आदरणीय सर,
मोक्का मध्ये पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट- 4 चे ताब्यात
आज रोजी मा. वरिष्ठांच्या आदेशाने युनिट-४ चे पथक, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नागेशसिंग कुंवर, देविदास वांढरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी नामे आदेश उर्फ गणेश रवींद्र जगताप हा चिमा घाट उद्यान येरवडा पुणे येथे येणार आहे.’ अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट-४ चे पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन , त्याचे नाव पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव आदेश उर्फ गणेश रवींद्र जगताप रा. सर्वे नंबर २ शेलार चाळ येरवडा पुणे असे सांगितले. त्याचे बाबत येरवडा पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली असता, त्याचे विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नंबर१८३/२०२५भा.न्या. सं.कलम.११८(२),११८(१), ११५(२)३५१(३),३(५) आर्म ॲक्ट ४(२५) म. पो. का. कलम ३७ (१) (ब) सह १३५ क्रि. लॉ ३ व ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यास पुढील कारवाई करिता वैद्यकीय तपासणी करून येरवडा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
*आदरपूर्वक सादर,*
*( अजय वाघमारे )*
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहर




