दहीहंडी उत्सावामध्ये अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम राबवून अनोखा उपक्रम राबवण्यात आला..!

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयामार्फत अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवणेबाबत सुचना प्राप्त दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), अश्विनी जगताप, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, सचिन शिंदे यांनी दि.१३/०८/२०२५ ते १७/०८/२०२५ दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गाडीतळ हडपसर, अण्णसाहेब मगर कॉलेज, अॅमनोरा स्कुल, मनपा शाळा क्रमांक ३२ या ठिकाणी पथनाट्य, फ्लेक्स, कार्यशाळा अशा माध्यमांचा वापर करून जनजागृती करून त्यामधुन विद्यार्थ्यां पर्यंत अंमली पदार्थाच्या सवेनामुळे त्यांच्यावर काय दुष्परीणाम होतात तसेच ते जवळ बाळगल्याने त्यांच्यावर काय कारवाई होवू शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दि.१६/०८/२०२५ व १७/०८/२०२५ रोजी साजरी होत असलेल्या दहीहंडी उत्सवाचे औचीत्य साधून मांजरी व हडपसर भागात अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीमे अंतर्गत अनोखा उपक्रम राबवण्यात आला. त्यामधून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम बाबत होर्डीग / फ्लेक्स लावून तसेच अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम या बाबत उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस निरी. (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, यांचे सुचनांप्रमाणे राबवण्यात आली.




