पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून तरुणावर कोयत्याने वार, एरंडवणे भागातील घटना

पुणे : पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने तिघांनी एकावर कोयत्याने वार केल्याची घटना एरंडवणे भागात घडली. याप्रकणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल अशोक बानगुडे (वय ४०, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. बानगुडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी यश राजेश कंधारे (वय २२, रा. रतनदीप सोसायटी, पटवर्धन बागेजवळ, एरंडवणे), ओम राजेश कंधारे (वय १८) आणि राजेश विठ्ठल कंधारे (वय ५०, रा. एरंडवणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बानगुडे व आरोपी यांच्यात वाद झाले होते. गुरुवारी सायंकाळी बानगुडे भालेकर वस्ती परिसरातील गणेश मंदिराजवळ थांबले होते. तेव्हा आरोपी यश कंधारे तेथे आला. ‘आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे का घेत नाही़, आमच्या नादी लागतो का ?’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी ओम कंधारे, राजेश कंधारे दुचाकीवरुन तेथे आले. बानगुडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. जखमी अवस्थेत बानगुडे तेथून पळाले. तेव्हा आरोपी राजेशने दुचाकीवरुन पाठलाग केला. ‘तुझ्यावर सोनसाखळी चोरीचा खोटा गु्न्हा दाखल करू’, अशी धमकी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page